CM Eknath shinde
CM Eknath shindeTeam Lokshahi

एक सामान्य शाखाप्रमुख ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संघर्षमय राजकीय प्रवास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. (CM Eknath Shinde) शिवसेनेचा एक सामान्य शाखाप्रमुख ते आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदांपर्यंत मजल मारलेला एक करारी राजकारणी; ही एकनाथ शिंदेंची ओळख. आज मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस...मुख्यमंत्र्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणारा लोकशाहीचा (Lokshahi Marathi) विशेष लेख.
Published by :
Team Lokshahi

रोहित शिंदे | मुंबई : महाराष्ट्रात 21 जून रोजी राजकीय भूकंप (Split in ShivSena) झाला. राज्यात शिंदेंच्या नेतृत्वात 40 शिवसेना आमदारांनी बंड (Rebellion of Eknath Shinde) पुकारलं आणि एकनाथ शिंदे राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आले. पुढे या बंडामुळे राज्यात सत्तापालट झाला. अस्तित्वात आलेल्या शिंदे-भाजप सरकारमध्ये (Shinde Bjp Government) मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे विराजमान झाले.

संघर्षमय राजकीय प्रवास: (CM Eknath shinde life journey) शिवसेनेचा एक सामान्य शाखाप्रमुख; ते आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदांपर्यंत मजल मारलेला एक करारी राजकारणी हि शिंदेंची महाराष्ट्रातील जनतेला असणारी ओळख. परंतु, एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास तितकाचं रंजक आणि संषर्षमय राहिला आहे. सुरूवातीच्या काळात एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या (Dharmaveer Anand Dighe) छायेत वाढले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या प्रभावामुळे ते 1980 च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. किसननगरच्या शाखाप्रमुख पदापासुन राजकीय कारकि‍र्दीला शिंदेंनी सुरूवात केली. कठोर मेहनत, धडाडीचा स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती हि शिंदेंची बलस्थाने आहेत. 2004 मध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघातुन विधानसभेवर आमदार म्हणुन शिंदे निवडुन गेले. पुढे सलग 2009,2014,2019 कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातुन विधानसभेची निवडणुक जिंकले.

2019 ते 2022 च्या दरम्यान महाविकास आघाडीत नगरविकास खात्याची जबाबदारी पार पाडली. जुन 2022 मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंनी बंडाचं निशाणं फडकवलं. शिवसेनेच्या 40 आमदारांचा गट एकनाथ शिंदेच्या पाठीशी आला. पुढे या यशस्वी बंडाची परिणीती महाराष्ट्रात सत्तापालट होण्यात झाली. 30 जुन 2022 रोजी शिंदेंनी शिंदे-भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आपल्या यशस्वी बंडामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जगभरात चर्चेत आले.

थेट जनतेत मिसळणारे मुख्यमंत्री...लोकनाथ: (Mass Leader Eknath Shinde) परंतु, याच्यापलीकडेही 'अनाथांचा नाथ एकनाथ....गोरगरिबांचा लोकनाथ..एकनाथ हि एकनाथ शिंदेंची असणारी ओळखही त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि कार्याला साजेशी अशीचं आहे. थेट ग्राऊंड झिरो वर उतरून लोकांच्या समस्या समजुन घेत, त्यांचे अश्रू पुसताना अनेकदा एकनाथ शिंदे दिसले आहेत. म्हणुनचं बहुधा एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास शक्य झाला असावा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com