राजकारण
देश जळत असताना पुरस्काराच्या मेजवान्या कशासाठी? मोदींच्या दौऱ्याविरोधात युवक काँग्रेसकडून पोस्टर्स
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्काराच्या निमित्ताने १ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्काराच्या निमित्ताने १ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसकडून ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहे. परंतु पंतप्रधान मोदींना पुरस्कार देण्याला आणि त्यांच्या पुणे दौऱ्याला विरोध होत आहे. देश जळत असताना पुरस्काराच्या मेजवान्या कशासाठी असे या पोस्टर्सवर लिहिण्यात आले आहे.