निवडणुकीच्या सर्व्हेत भाजपला धक्का! गमवाव्या लागणार 'इतक्या' जागा

निवडणुकीच्या सर्व्हेत भाजपला धक्का! गमवाव्या लागणार 'इतक्या' जागा

देशभरात निवडणुकांची चाहूल लागत आहेत. अशातच, भाजप आणि आरएसएसची संस्था म्हणून गणल्या जाणाऱ्या प्रबोधिनीने देशभरातील जागांचा आढावा घेतला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : देशभरात निवडणुकांची चाहूल लागत आहेत. अशातच, भाजप आणि आरएसएसची संस्था म्हणून गणल्या जाणाऱ्या प्रबोधिनीने देशभरातील जागांचा आढावा घेतला आहे. या सर्व्हेत धक्कादायक असे निकाल समोर आले आहेत. यामध्ये भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकीत 100 पेक्षा अधिक जागांवर फटका बसण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातही जागेसाठी भाजपला मोठा कस लावावा लागणार आहे.

निवडणुकीच्या सर्व्हेत भाजपला धक्का! गमवाव्या लागणार 'इतक्या' जागा
मराठा आरक्षणासाठी आज महत्वाची बैठक; जरांगे पाटील म्हणाले...

प्रबोधिनीने दर तीन महिन्यांनी भाजपा पक्षांतर्गत सर्वे करत असते. यानुसार भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त 218 जागा मिळतील तर इंडिया आघाडीला 239 ते 256 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या लोकसभेत भाजपाचे संख्याबळ 303 आहे. याचाच अर्थ भाजपला किमान 115 जागा गमवाव्या लागतील, असे या सर्व्हेत सांगितले आहे.

तर, महाराष्ट्रातही भाजपला निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्याता आहे. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस-अजित पवार या युतीला फक्त 21 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला २७ जागा मिळतील, असे सर्व्हेत नोंदविले आहे. यामुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्थता आहे.

दरम्यान, इंडिया आघाडी करुन विरोधकांनी मोदींचा रथ रोखण्यासाठी वातावरण तयार करत आहेत. 2014पासून देशभरातल असलेली मोदी लाट आता कमी होताना दिसत आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींना कॉंग्रेसमध्ये आलेली मरगळ झटकण्यास यश आले आहे. याची प्रचितीही कर्नाटकमध्ये आली. तर, मणिपूर मुद्दा, महागाई, शेतकरी आत्महत्या यांसारखे मुद्द्यांवर मोदींनी अवाक्षरही न काढल्याने देशभरात नकारात्मक वातावरण तयार होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com