नवाब मलिक हे अजित पवार गटात आहेत का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितले

नवाब मलिक हे अजित पवार गटात आहेत का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक जामिनावर बाहेर आल्यानंतर सत्ताधारी बाकावर बसले होते. यावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक जामिनावर बाहेर आल्यानंतर सत्ताधारी बाकावर बसले होते. विरोधकांनी या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली. तर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनाच पत्र लिहिलं. यावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नवाब मलिकांशी आम्ही कुठली राजकीय चर्चा केली नाही, आम्ही त्यांना सामील केलेले नाही. निवडणूक आयोगात आम्ही त्यांचं कोणताही कागदपत्रं किंवा अफिडेवीट दिलेलं नाही, असे पटेलांनी सांगितले.

नवाब मलिक हे अजित पवार गटात आहेत का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितले
Devendra Fadnavis : अंतरवाली सराटीमधील लाठीचार्जवर गृहमंत्री फडणवीसांकडून लेखी उत्तर

प्रफुल्ल पटेल,बाईट म्हणाले की, नवाब मलिक आमचे जुने जेष्ठ सहकारी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मधल्या काळात काही घटना झाल्या त्या सर्व तुम्हाला माहिती आहे, त्यावेळी नवाब मलिक कोणाच्याही बरोबर नव्हते, त्यांच्या मेडिकल ग्राउंडवर जामीन झाल्यानंतर त्यांच्या तब्येतीची माहितीसाठी आम्ही सगळे त्यांना भेटलो होतो. मलिक विधानसभेचे प्रतिनिधी आहेत, जुने सहकारी आहेत एकमेकांना भेटायचे स्वाभाविक आहे. मलिक कोणासोबत आहेत, काय करायचं, पुढची त्यांची वाटचाल काय? असावी त्याची चर्चा केली नाही. ते मेडिकल ग्राउंड वर जामीनवर असल्याने आम्हाला त्यांच्यासोबत काही चर्चा करायची नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत बसण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे, काही कोणाला भेटल्यानंतर आम्ही त्यांना पुरस्कृत करतो की दुसरे त्यांना पुरस्कृत करतात हे म्हणणं चुकीचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी काही पत्र लिहिलं असेल त्याच्या काही वेगळा अर्थ काढायचे गरज नाही. ते आमच्याकडे आहेत की दुसरीकडे आहेत याबाबत आम्ही बोललो नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे. चार राज्याच्या निवडणुकीत जो निकाल लागला आहे. त्याच्यामुळे विरोधक चित झाले आहेत, असा निशाणाही प्रफुल्ल पटेलांनी साधला आहे.

दरम्यान, मलिकांनंतर विरोधकांनी प्रफुल्ल पटेलांना मिर्ची कनेक्शनवरुन घेरले होते. यावर ते म्हणाले, माझ्याबद्दल ज्यांना जाणच नाही त्याच्याबद्दल मी उत्तर कशाला देऊ. माझ्याबद्दल जे उत्तर द्यायचं होतं ते खुद्द शरद पवारांनी पूर्वी दिलेला आहे. माझे कुठलेही कोणाशी संबंध नाही. नाना पटोलेंसारखे इतर नेते हताश झालेले आहेत त्यांना माहिती आहे की उद्या ते संकटात येणार आहे, अशी टीका प्रफुल्ल पटेलांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com