राजकारण
...पण आता आम्ही मागे फिरणार नाही; प्रफुल्ल पटेल
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी मी फोन करणार आहे. पण, आता आम्ही मागे वळून बघणार नाही. कायदेशीर कारवाईचा आमच्यावर कोणताही फरक पडणार नाही. येत्या दहा दिवसांत भविष्यातील वाटचालीसंदर्भात भूमिका स्पष्ट होणार आहे. असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.