Prakash Ambedkar : काँग्रेसकडून एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचे काम सुरू

Prakash Ambedkar : काँग्रेसकडून एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचे काम सुरू

प्रकाश आंबेडकर ओबीसी मेळाव्यातून बोलत होते.
Published by :
Siddhi Naringrekar

प्रकाश आंबेडकर ओबीसी मेळाव्यातून बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इंडिया आघाडीचे भवितव्य काँग्रेसच्या ताठरपणामुळेच धोक्यात आले असून, इंडिया आघाडीची वाटचाल जवळपास संपुष्टात आली आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

तसेच काँग्रेसकडून एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचे काम सुरू आहे. राहुल गांधी हे एकीकडे भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे इंडिया आघाडीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पुढे केले जात आहे. असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com