शरद पवार यांच्यासोबत आमचे जुने वाद, पण... : प्रकाश आंबेडकर

शरद पवार यांच्यासोबत आमचे जुने वाद, पण... : प्रकाश आंबेडकर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली आहे. याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. वंचितची युती शिवसेनेसोबत झाली असून महाविकास आघाडीसोबत अद्याप झालेली नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. याबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यासोबत आमचे जुने वाद आहेत, पण ते देखील आमच्या सोबत येतील अशी अपेक्षा ठेवतो, असे म्हंटले आहे.

शरद पवार यांच्यासोबत आमचे जुने वाद, पण... : प्रकाश आंबेडकर
शिवशक्ती-भीमशक्ती अखेर एकत्र! उध्दव ठाकरेंकडून युतीची घोषणा

गेली अनेक वर्षे उपेक्षितांचे राजकारणासाठी आम्ही प्रयत्न केला. जिंकून येणं हे मतदारांच्या हातात आहे. परंतु, उमेदवारी देणं हे राजकीय पक्षांच्या हातात आहे. उमेदवारीचं सार्वत्रिक व्हावं, अशी अपेक्षा आहे. आता आम्ही दोघेच एकत्र आलो आहोत. काँग्रेस स्वतःचा निर्णय घेतील. तर, राष्ट्रवादीबद्दल बोलताना त्यांनी म्हंटले की, मी शरद पवारांची प्रतिक्रिया वाचली. आमचं जुनं भांडण आहे. शेतावरचं भांडण नाही. नेतृत्वाचं भांडण नाही. देशासाठीचं भांडण आहे. ते आमच्या सोबत येतील ही अपेक्षा ठेवतो, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हंटले आहे.

कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. पंतप्रधान मोदी यांचाही अंत होणार आहे. त्यांनी नेतृत्व उभं राहू दिलं नाही, जे होतं ते संपवलं, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र येत आहोत. ठाकरे-आंबेडकर यांचे नातं जुनं आहे. आता जे राजकारणामध्ये जे चाललं आहे. सगळं मोडून काढलं जात आहे. देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी व लोकशाही जिवंत आहे हे दाखवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, असे म्हणत त्यांनी युतीची घोषणा केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com