ओबीसी बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी-शिवीगाळ केल्याचा प्रकाश शेंडगे यांचा आरोप

ओबीसी बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी-शिवीगाळ केल्याचा प्रकाश शेंडगे यांचा आरोप

सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातल्या खरशिंग गावात मराठा समाजातल्या तरुणांकडून ही दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप ओबीसी नेते आणि सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

ओबीसी बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या निवडणुकीचा प्रचार सुरू असताना खरशिंग गावामध्ये मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांकडून गावात प्रचार साहित्य वाटू देण्यात आलं नाही, तसेच आपणाला आणि छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाला विरोध केल्याच्या भावनेतुन शिवीगाळ देखील केल्याचा आरोप देखील प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. दरम्यान या घटने प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचा प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com