सुप्त शक्ती मराठा आरक्षणावर स्वार होऊन राज्य अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न करताहेत : दरेकर

सुप्त शक्ती मराठा आरक्षणावर स्वार होऊन राज्य अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न करताहेत : दरेकर

मनोज जरांगे पाटलांनी सरकारला उद्यापर्यंतच्या अल्टीमेटम दिला आहे. यावर प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया देत भूमिका मांडली आहे.

मुंबई : राज्य सरकारने 24 तारखेच्या आत आरक्षण दिलं नाही तर 25 तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत भूमिका मांडली आहे. सरसकट कुणबी दाखला देता येत नाही. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेता येत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हीच सार्वत्रिक भूमिका पुढे येत आहे, असेही दरेकर म्हणाले आहेत.

सुप्त शक्ती मराठा आरक्षणावर स्वार होऊन राज्य अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न करताहेत : दरेकर
उदय सामंतांनी रत्नागिरीत तब्बल 80 कोटींचा केला 'डांबर घोटाळा'; कुणी केला आरोप?

मनोज जरांगे पाटील यांचा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. याबाबत अनेक भूमिका समोर येत आहेत. मराठा क्रांती मोर्चाने भूमिका जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा दाखला त्यांनी दिला. मराठा समाजाची भूमिका हीच आहे. दुसऱ्या समाजाचे आरक्षण नको. दुसऱ्यांच्या ताटातील नको. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हीच सार्वत्रिक भूमिका पुढे येत आहे. यासंदर्भात बरेचसे चित्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत समोर आले, असे प्रवीण दरेकरांनी म्हंटले आहे.

मराठा समाजासंदर्भात दिलेल्या जाहिरातीवर विरोधक टीका करत आहेत. मराठा समाजासाठी तात्पुरत्या उपाययोजना म्हणून केलेल्या त्या तरतूदी होत्या. अशोक चव्हाण हे अवसरवादी आहेत. आत्ताच्या आंदोलनावर ते पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत हे सुद्धा भोंदू बाबा सारखे संधी साधत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेने मुख्यमंत्री असताना त्यावेळी मराठा समाजाला दाबण्याचे प्रयत्न केले, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली आहे.

उद्धव ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले. तेच आरक्षण फडणवीस सरकारने टिकवले होते. समाजाप्रती माझ्या संवेदना आहेत. कुठेही शिंदे व फडणवीस यांनी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतली नाही. त्यांना टिकेल असे आरक्षण द्यायचे आहे. मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये. मराठा समाजात मतभेद असू शकतील. पण त्यांना एकाच ध्येयाप्रती जायचे आहे, असेही ते म्हणाले आहेत.

सरसकट कुणबी दाखला देता येत नाही. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेता येत नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. कायद्यात टिकेल असे आरक्षण देण्याची गरज आहे. पुन्हा आरक्षण टिकले नाही, तर ता दिशाभूल ठरेल. तसे खोटे आरक्षण मुख्यमंत्री देऊ इच्छित नाही. काही सुप्त शक्ती मराठा आरक्षणावर स्वार होऊन राज्य अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, असाही निशाणा त्यांनी विरोधकांवर साधला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com