PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौरा

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळच्या दौऱ्यावर येणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळच्या दौऱ्यावर येणार आहेत. उद्या 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळला येणार आहेत. पंतप्रधान यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारी परिसरात मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मोदी बचत गटाच्या महिलांना करणार संबोधित करणार आहेत. या मेळाव्यासाठी भारी परिसरात सुमारे 45 एकर जागेत या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे. पंतप्रधान मोदी हे चौथ्यांदा यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहेत.

पंतप्रधानांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्यासाठी ३० विविध समित्या स्थापन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com