धनंजय मुंडे लोकसभा लढवणार? प्रीतम मुंडे म्हणाल्या, तगडी फाईट...

धनंजय मुंडे लोकसभा लढवणार? प्रीतम मुंडे म्हणाल्या, तगडी फाईट...

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा असून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेही लोकसभेच्या रिंगणात उतरणार या चर्चांना उधाण आले होते.

विकास माने | बीड : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरणार या चर्चांना उधाण आले होते. परंतु, त्या चर्चांवर धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला होता. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. तगडी फाईट होईल असा उमेदवार मिळाला तर मला आनंद वाटायला हवा. पण मला आनंद वाटत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

धनंजय मुंडे लोकसभा लढवणार? प्रीतम मुंडे म्हणाल्या, तगडी फाईट...
शिरसाटांना क्लीनचिट मिळाल्यानंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, पोलिसांवर दबाव...

मी काम करते का नाही याचा लेखाजोखा जनता देईल. विरोधी उमेदवार चांगला असावा, आपल्याला प्रेरणा मिळते. राष्ट्रवादीला अजून उमेदवार निश्चित करता आला नाही. त्यामुळे लोकसभेची निवडणूक अर्धी आपण जिंकलेली आहे. तगडी फाईट होईल असा उमेदवार मिळाला तर मला आनंद वाटायला हवा. पण मला आनंद वाटत नाही. त्यांना पक्षाने आदेश दिला आणि त्यांनी समोर लढवायच ठरवलं तर काही नाही. तशी आमची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत राहिली आहे, असे प्रीतम मुंडे यांनी म्हंटले आहे.

तर, दिल्ली महिला खेळाडू प्रकरणी बोलताना प्रीतम मुंडे म्हणाल्या की, महिला खेळाडूंची तक्रार आल्यास दखल घेतली पाहिजे. दखल घेतली जात नसेल तर लोकशाहीमध्ये ही घटना स्वागतार्ह नाही. योग्य कारवाई झालीच पाहिजे, असा घरचा आहेर त्यांनी भाजपला दिला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले होते. मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही. लोकसभेचा उमेदवार म्हणून पक्षांनी माझ्यासोबत कसलीही चर्चा केली नाही. माझ्या दृष्टीने दिल्ली खूप दूर आहे. माझी लायकी लोकसभा लढविण्याची नाही. मी आणखीन खूप लहान आहे, असे सांगत धनंजय मुंडे यांनी तूर्तास तरी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com