...तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांना बाजूला ठेवावे; पृथ्वीराज चव्हाणांचा सल्ला

...तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांना बाजूला ठेवावे; पृथ्वीराज चव्हाणांचा सल्ला

गायरान जमीन घोटाळ्यावरून अब्दुल सत्तारांविरोधात विरोधी पक्ष आक्रमक

मुंबई : अब्दुल सत्तार पुन्हा एकदा विरोधकांच्या आरोपावरून चर्चेत आले आहे. शिंदे-भाजप सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत अब्दुल सत्तारांना बाजूला ठेवावे, असे त्यांनी म्हंटले आहे.

...तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांना बाजूला ठेवावे; पृथ्वीराज चव्हाणांचा सल्ला
मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची...; फडणवीसांनी कर्नाटकला ठणकावले

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सीमाप्रश्नी ठराव हा एकमताने झाला आहे. कर्नाटकला असा ठराव करण्याचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो राज्यांना मान्य करावा लागेल. घटनात्मक तरतुदी मान्य कराव्या लागतील. आपल्या राज्याचा दावा २००४ मध्ये केला होता. आपल्याला गाव मिळतील यासाठी चांगले वकील दिले आहेत. सामोपचाराने प्रश्न सुटला पाहिजे. पुन्हा-पुन्हा ठराव मांडून उपयोग नाही, असे मत त्यांनी मांडले आहे.

ज्यांनी घोटाळे केले ते उघडकीस आले आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घ्यायला हवी. न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत अब्दुल सत्तारांना बाजूला ठेवा. अजित पवार यांनी सिल्लोडबद्दल मुद्दा मांडला आहे. मुख्यमंत्र्यांना स्वच्छ प्रशासन द्यायचे असेल तर त्यांनी कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

...तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांना बाजूला ठेवावे; पृथ्वीराज चव्हाणांचा सल्ला
अलिबाबा अन् 40 चोरांचे 25 घोटाळे बाहेर काढणार : संजय राऊत

तसेच, पीएमएलए कायदा याबद्दल विचार व्हायला पाहिजे. महाराष्ट्रात आतापर्यंत २९०० रेड झाल्या आहेत. आपलं राज्य म्हणजे "रेड राज्य" झालं आहे. न्यायालयाचा वापार हे राजकीय हत्यार म्हणून होतो आहे हे दुर्दैव आहे. अनिल देशमुख यांना वर्ष दीड वर्ष आत ठेवलं, नवाब मलिक अजून आत आहेत यावर आता अजून काय बोलणार, अशा शब्दांत शिंदे-फडणवीस सरकारवर पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे.

दरम्यान, शिंदे-भाजप सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांनी वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप आहे. यामुळे सत्तार पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com