राहुल गांधींची खासदारकी रद्द! कॉंग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आवाज बंद करण्यासाठी...

राहुल गांधींची खासदारकी रद्द! कॉंग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आवाज बंद करण्यासाठी...

राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टीकेच्या प्रकरणी सुरत न्यायालयाने काल (23 मार्चला) दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. अशातच, राहुल गांधी यांची आता खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे विरोधकांमध्ये एकच खळबळ माजली असून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधींची खासदारकी रद्द! कॉंग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आवाज बंद करण्यासाठी...
Rahul Gandhi : मोठी बातमी: राहुल गांधींची खासदारकी रद्द; लोकसभा अध्यक्षांची कारवाई

राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली. खासदारकी रद्द होण्याचा अंदाज होता. सूड भावनेने केलेली ही कारवाई आहे. राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हा प्रकार म्हणजे अघोषित आणीबाणीच आहे. त्यांना जनता माफ करणार नाही. आम्ही कायदेशीर रस्त्यावरील लढाई लढणार आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. याप्रकरणी अखेर सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामध्ये न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीनही मंजूर केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com