Prithviraj Chavan : काम अपूर्ण असताना निवडणुकीच्या तोंडावर राममंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई कशासाठी?

Prithviraj Chavan : काम अपूर्ण असताना निवडणुकीच्या तोंडावर राममंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई कशासाठी?

२२ जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

२२ जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. एकीकडे या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हिंदू ट्रस्टने लोकांकडून राम मंदिरासाठी पैसे गोळा केले. ते भव्य मंदिर बांधत आहेत. त्यामध्ये वादाचा काही प्रश्न नाही. त्यांचे स्वागत आहे. पण मंदिर अजून दोन ते तीन वर्ष पुर्ण व्हायला वेळ लागणार आहे.

काम अपूर्ण असताना निवडणुकीच्या तोंडावर प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई का करत आहात. या कार्यक्रमासाठी शंकराचार्य, राष्ट्रपती अशा महत्त्वाच्या लोकांना बोलावले गेले नाही. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com