प्रियंका चतुर्वेदींनी घेतली अमित शाहांची भेट; फडणवीसांची केली तक्रार

प्रियंका चतुर्वेदींनी घेतली अमित शाहांची भेट; फडणवीसांची केली तक्रार

प्रियंका चतुर्वेदी यांनी आज रोशनी शिंदे प्रकरणात अमित शाह यांची भेट घेतली

मुंबई : ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्ती रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. यावरुन राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत असून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं दुर्लक्ष होतं असल्याचा आरोप चतुर्वेदींनी केला आहे.

प्रियंका चतुर्वेदींनी घेतली अमित शाहांची भेट; फडणवीसांची केली तक्रार
त्रिवेदीला पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं; रोहित पवारांचे भाजपवर टीकास्त्र

रोशनी शिंदे प्रकरणी प्रियंका चतुर्वेदी यांनी आज अमित शाह यांची भेट घेतली. राज्यातील विविध घडामोडींवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत प्रियंका चतुर्वेदींना विचारले असता देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यात घडत असलेल्या घटनांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांची भेट घेतली, अशी टीका त्यांनी फडणवीसांवर केली आहे.

दरम्यान, ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत मारहाण केली होती. या मारहाणीनंतर रोशनी शिंदे यांनी याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतर रोशनी शिंदे यांच्याच अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 4 एप्रिल रोजी संध्याकाळी रोशनी शिंदे यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे ठाकरे गट आता अधिक आक्रमक झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com