'अहंकारी राजा' रस्त्यावर...; कुस्तीपटूंवर कारवाईबाबत राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

'अहंकारी राजा' रस्त्यावर...; कुस्तीपटूंवर कारवाईबाबत राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले. तर दुसरीकडे ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले. तर दुसरीकडे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI)चे प्रमुख ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरून कुस्तीपटूंचा तंबूही हटवला आहे. यावर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

'अहंकारी राजा' रस्त्यावर...; कुस्तीपटूंवर कारवाईबाबत राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
कुस्तीपटू पोलिसांच्या ताब्यात, जंतरमंतरवरून पोलिसांनी हटवले तंबू

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट केले, राज्याभिषेक पूर्ण. अभिमानी राजा रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे, असा निशाणा राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर साधला आहे. तर, कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट केले. खेळाडूंच्या छातीवरील पदके ही आपल्या देशाची शान आहे. त्या पदकांसह खेळाडूंच्या मेहनतीमुळे देशाचा मान वाढतो. भाजप सरकारचा अहंकार इतका वाढला आहे की सरकार निर्दयीपणे आपल्या महिला खेळाडूंचा आवाज बुटाखाली दाबत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे, सरकारचा अहंकार आणि हा अन्याय संपूर्ण देश पाहत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

नव्या संसदेच्या उद्घाटनाचा अधिकार राष्ट्रपतींकडून हिसकावून घेतला गेला, महिला खेळाडूंना हुकूमशाही बळावर रस्त्यावर मारहाण! भाजप-आरएसएसच्या सत्ताधाऱ्यांचे तीन खोटे आता देशासमोर उघड झाले आहेत. 1. लोकशाही, 2. राष्ट्रवाद, 3. बालिका वाचवा....मोदीजी लक्षात ठेवा, असा इशारा कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.

दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात 23 एप्रिलपासून जंतर-मंतरवर कुस्तीपटूंची निदर्शने सुरु असून आज नव्या संसद भवनाकडे शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. सकाळी 11.30 वाजता कुस्तीपटू नवीन संसद भवनाकडे रवाना झाले. यावेळी पोलिसांनी साक्षी मलिकसह काही कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. पोलिसांनी बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांना ताब्यात घेतल्यानंतर ते रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरु केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com