...अन् राहुल गांधींनी दिले त्याच्या स्वप्नांना पंख!  
चिमुकल्याला संगणक दिला भेट

...अन् राहुल गांधींनी दिले त्याच्या स्वप्नांना पंख! चिमुकल्याला संगणक दिला भेट

काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या नांदेडमध्ये आहे. या यात्रेत अनेक जण सहभागी होत आहेत.

कल्पना नालसकर | नांदेड : काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या नांदेडमध्ये आहे. या यात्रेत अनेक जण सहभागी होत आहेत. याच दरम्यान राहुल गांधी नागरिकांशी संवाद साधत आहेत. तर, अनेकांच्या समस्या ऐकून घेत भाषणातून मांडत आहेत. अशातच राहुल गांधींनी महाराष्ट्रातील एका चिमुकल्याची इच्छा पूर्ण केली आहे.

...अन् राहुल गांधींनी दिले त्याच्या स्वप्नांना पंख!  
चिमुकल्याला संगणक दिला भेट
भारत जोडो यात्रे'त आदित्य ठाकरे सहभागी होणार, यात्रेत राहुल गांधींसोबत पायी चालणार

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची नांदेड येथील सर्वेश हातने याने भेट घेतली. या मुलाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याची इच्छा राहुल गांधींना बोलून दाखवली. पण, आजपर्यंत त्याने संगणक पाहिला नाही हेही सांगितले होते. भाषणादरम्यान राहुल गांधींनी याचा उल्लेखही केला होता. त्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दखल घेत सर्वेशला आज सकाळी राहुल गांधींच्या उपस्थितीत संगणक भेट दिला. यामुळे सर्वेशचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

दरम्यान, भारत जोडो यात्रेचा आज 65 वा दिवस असून काल राहुल गांधींसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे या देखील या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. तर, आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे व कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com