राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवांकडून अधिसूचना जाहीर केली आहे. राहुल गांधी आता पुन्हा संसदेत दिसणार. मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी गमवावी लागली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे आता खासदारकी त्यांनी पुन्हा देत कागदपत्र लोकसभा सचिवालायकडून जारी करण्यात आले आहेत.
2019 साली निवडणूक प्रचारादरम्यान कर्नाटकमधील कोलार येथील सभेत राहुल गांधी यांनी सर्व चोरांचे आडनाव मोदी कसं असंत? असा प्रश्न त्यांनी सभेत विचारला होता. कोर्टाच्या निर्णायची प्रत आणि अन्य कागदपत्र काँग्रेसनं तातडीनं लोकसभा सचिवालयाकडे सुपूर्द केले होते. आज सकाळी लोकसभा सचिवालयाची बैठक झाली, ज्यामध्ये यााबबत अधिसूचना जारी करण्यात आली. राहुल गांधींना खासदारकी बहाल झाल्यामुळे राहुल गांधींना उर्वरीत अधिवेशनात सहभागी होता येणार आहे.