Rahul Gandhi Marriage : राहुलचे लग्न कधी? शेतकरी महिलांच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, तुम्हीच मुलगी...

Rahul Gandhi Marriage : राहुलचे लग्न कधी? शेतकरी महिलांच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, तुम्हीच मुलगी...

काँग्रेस नेते राहुल गांधी हे विविध मुद्द्यांवर आपल्याला बोलताना दिसतात.
Published by :
Siddhi Naringrekar

काँग्रेस नेते राहुल गांधी हे विविध मुद्द्यांवर आपल्याला बोलताना दिसतात. त्यामुळे ते नेहमी चर्चेत देखिल असतात. मात्र अजून एका विषयामुळे राहुल गांधी सारखे चर्चेत असतात. ते म्हणजे त्यांचे लग्न. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी हरियाणातील महिला शेतकऱ्यांना डिनरसाठी आमंत्रित केले होते. एका महिलेने सोनिया गांधी यांना राहुलचे लग्न करण्यास सांगितले. यावर सोनियाने त्यांच्यासमोरच मुलगी शोधण्याचा प्रस्ताव ठेवला.

जेवणासाठी आलेल्या महिलांनी सोनिया गांधी यांच्याशी राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत चर्चा केली. हरियाणातील शेतकरी महिलांना नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. या महिलांनी सोनिया गांधी यांना त्यांचे लग्न कधी करणार, हा प्रश्न विचारला, सोनिया गांधी म्हणाल्या, तुम्हीच मुलगी शोधून द्या ना. हे उत्तर ऐकून बाजूला बसलेले राहुल गांधी स्मितहास्य करीत म्हणाले, हो, होईल. हा व्हीडिओ युट्युबर शेअर करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com