खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणतीही किंमत मोजायला तयार

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणतीही किंमत मोजायला तयार

लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. सुरत न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. याविरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली असून राज्यभरात आंदोलने केली जात आहे. तर, याचे पडसाद सभागृहात उटलेले पाहायला मिळाले. यामध्ये राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणतीही किंमत मोजायला तयार
हा प्रश्न केवळ खासदारापुरता नाही, तर...: आदित्य ठाकरे

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा त्यांचा आरोप होता. याप्रकरणी अखेर सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामध्ये न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीनही मंजूर केला होता.

तर, आज राहुल गांधींची खासदारकी आज रद्द करण्यात आली. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षांनी याचा निषेध केला आहे. अशातच, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया आली आहे. मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्वावर टांगती तलवार होती. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, खासदार आणि आमदारांना कोणत्याही परिस्थितीत 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असेल, तर त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभेतून) रद्द केले जाईल. एवढेच नाही तर शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर ते सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरतील. यामुळे 2024 ची निवडणूकही राहुल गांधी लढवू शकणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com