Rahul Gandhi
Rahul Gandhi Team Lokshahi

थेट अमेरिकेत राहुल गांधींनी केला ट्रकने प्रवास; पाहा व्हिडिओ

या प्रवासादरम्यान राहुल गांधींनी सिद्धू मुसेवाला यांची गाणीही ऐकली.
Published by :
Sagar Pradhan

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी ट्रकमधून प्रवास करण्याचा अनुभव घेतला. राहुल गांधींनी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या ट्रक ड्रायव्हरसोबत वॉशिंग्टन डीसी ते न्यूयॉर्क तब्बल 190 किलोमीटर प्रवास केला. यावेळी त्यांनी ट्रक चालकाशी मनसोक्त गप्पा केल्या. सोबतच अमेरिकेतील ट्रक चालकांच्या दैनंदिन जीवनाविषयी जाणून घेतले. याआधी त्यांनी भारतातही दिल्ली ते चंदीगडपर्यंत ट्रकने प्रवास करून चालकांच्या समस्या ऐकल्या होत्या.

ट्रक चालकांसोबत राहुल गांधींनी काय केल्या गप्पा?

प्रवासादरम्यान राहुल गांधी म्हणतात की, अमेरिकेत ट्रक ड्रायव्हरची सुरक्षितता आणि आराम लक्षात घेऊन तयार केले जातात, तर भारतात तसे नाही. या भेटीत भर देण्यात आला की, येथे ट्रकवाले तुटपुंजे वेतन आणि विक्रमी वाढीव किमतीत उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करत असताना, त्यांच्या अमेरिकन समकक्षांना त्यांच्या श्रमाचा आदर केला जातो. भारतातील वस्तूंच्या वाढत्या किंमती, महागाई आणि राजकारणाबाबत गिल यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान राहुल गांधी म्हणाले की, कोणताही धर्म कोणालाही द्वेष पसरवण्यास शिकवत नाही. असे ते म्हणाले. या प्रवासादरम्यान त्यांनी सिद्धू मुसेवाला यांची गाणीही ऐकली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com