Bharat Jodo Yatra
Bharat Jodo YatraTeam Lokshahi

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा, या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहन

देशभर सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. अशातच ही यात्रा नुकतीच महाराष्ट्रात दाखल झाली आहे. मात्र, राहुल गांधी यांनी या यात्रे दरम्यान पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरून आता पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्या वक्तव्यावरून राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा आणि त्यांना कायद्याचं राज्य असल्याचं दाखवून द्या अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Bharat Jodo Yatra
मुख्यमंत्री शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, दबावाचे राजकारण...

सावरकरांबाबत निंदनीय वक्तव्य केल्यामुळे भारत जोडो यात्रा थांबवावी अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली. हे राज्य कायद्याचं आणि सावरकरांचं आहे असं दाखवून देऊया असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

बिरसा मुंडा याच्या जयंती निमित्त बोलताना राहुल गांधी म्हणाले की, बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. गांधी म्हणाले, “ते (मुंडा) एक इंचही मागे सरकले नाहीत. तो हुतात्मा झाला. ही तुमची (आदिवासी) चिन्हे आहेत आणि तुम्हाला मार्ग दाखवतात. सावरकर हे भाजप-आरएसएसचे प्रतीक आहेत. ते दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यांनी दयेचे अर्ज लिहायला सुरुवात केली.

गांधींनी असा दावा केला की सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वतःवर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते हे सांगितले. ते म्हणाले, "ते इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांच्यासाठी काम करायचे आणि काँग्रेसच्या विरोधात काम करायचे."

Lokshahi Marathi
www.lokshahi.com