MLA Disqualification : ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक; 'या' तारखेला होणार पुढील सुनावणी

MLA Disqualification : ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक; 'या' तारखेला होणार पुढील सुनावणी

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी आजची सुनावणी आता संपली आहे. दीड तास झालेल्या आजच्या युक्तिवादावेळी व्हिपच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला.

मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी पुढील सुनावणी आता 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणाची कागदपत्रे ही 16 नोव्हेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहेत. दीड तास झालेल्या आजच्या युक्तिवादावेळी व्हिपच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. आमदारांना जारी करण्यात आलेला व्हिप हा ई-मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. तर तो व्हिप आपल्याला मिळालाच नसल्याने व्हिपचे उल्लंघन केलं नसल्याचं शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं.

MLA Disqualification : ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक; 'या' तारखेला होणार पुढील सुनावणी
जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ रवाना; कोणाकोणाचा समावेश?

ई-मेलच्या माध्यमातून आमदारांना व्हिप जारी केला होता. शिंदे गटाच्या 16 आमदारांना व्हिप बजावण्यात आला होता. जर आम्ही व्हीप पाठवलेला ई-मेल चुकीचा आहे तर बरोबर कुठला आहे ते त्यांनी सांगावं. आयटी कायद्यानुसार ई-मेल हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. एकनाथ शिंदे यांच्या गटाने जारी केलेलं व्हीपच घटनाबाह्य आहे. या प्रकरणात नव्याने पुरावे सादर करण्याची गरज नाही. जे पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर केले त्याला विरोध नाही. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे सुनावणी घ्यावी, असा युक्तीवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केला आहे.

आम्हाला व्हिपचा ई-मेल मिळालाच नसल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला आहे. व्हिपच मिळाला नसल्यानं त्याचं उल्लंघन केलं असं होत नाही. ठाकरे गटाच्या वकिलांचा पुन्हा पुरावे सादर करण्यास विरोध आहे. पुरावे सादर करण्याच्या नावाने ठाकरे गटाकडून वेळेचा विलंब होत आहे. एकनाथ शिंदे यांचा मेल आयडी त्यांच्या ताब्यात नाही. शिंदेंचा मेल फिशिंग झालेला असू शकतो, असाही दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला आहे.

विधानसभा अध्यक्ष काय म्हणाले?

दरम्यान, ठकारे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्यो जोरदार युक्तीवाद झाला. यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मला मर्यादित वेळेत ही सुनावणी घ्यायची आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होतोय, असे म्हंटले आहे. 25 सप्टेंबरच्या निर्णयानुसार पुरावे सादर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर 28 ऑक्टोबरला अर्ज दाखल केले. पण अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर व्हिपसंदर्भात प्रश्न निर्माण केला. शिंदे गटाने मेल मिळालाच नाही असे सांगितले. गेल्यावेळी मी सांगितले होते की पुरावे सादर करावेत, पण अद्याप अर्जावर सुनावणी सुरु आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com