सुप्रीम कोर्टाने फटकरल्यानंतर नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून...

सुप्रीम कोर्टाने फटकरल्यानंतर नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून...

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलेच फटकारलं आहे. अशातच, आता नार्वेकरांची प्रथम प्रतिक्रिया समोर येत आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलेच फटकारलं आहे. आम्ही नोटीस काढल्या, आदेश काढला तरीही विधानसभा अध्यक्षांनी काहीच निर्णय घेतला नाही. पुढच्या निवडणुकीच्या आधी निर्णय घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून नार्वेकरांवर टीका करण्यात येत आहे. अशातच, आता नार्वेकरांची प्रथम प्रतिक्रिया समोर येत आहे.

सुप्रीम कोर्टाने फटकरल्यानंतर नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून...
निव्वळ राजकारणासाठी खोटे आरोप; आशिष शेलारांचे शरद पवारांवर उत्तर

राहुल नार्वेकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अनादर होणार नाही. विधिमंडळातील नियमांशी कोणतीही तडजोड होणार नाही. संविधानाच्या नियमानुसारच निर्णय घेतले जातील. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी निर्णय देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर, कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही नार्वेकरांनी म्हंटले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी होती. यावेळी सरन्यायाधीशांनी राहुल नार्वेकर आणि महाधिवक्ता तुषार मेहता यांना चांगलंच फटकारलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी जूनपासून काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता त्यांनी पुढील निवडणुकीच्या आधी निर्णय घ्यावा. नाही तर आम्हाला एक आदेश काढावा लागेल, अशा शब्दात कोर्टाने अध्यक्षांना फटकारलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com