Bala Nandgaonkar : बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार राज ठाकरेच

Bala Nandgaonkar : बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार राज ठाकरेच

उध्दव ठाकरेंच्या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांचे वक्तव्य

मुंबई : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे खरे वारसदार राज ठाकरे (Raj Thackeray), असे मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी म्हंटले आहे. बाळा नांदगावकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Bala Nandgaonkar : बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार राज ठाकरेच
Uddhav Thackeray Interview : महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग चुकला, उध्दव ठाकरेंनी सांगितले...

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आज संजय राऊत यांनी सडेतोड मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर अनेक आरोप केले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख व्हायचे असून त्यांची महत्वाकांक्षा राक्षसी असल्याची टीका केली. तसेच, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न वापरण्याचा सल्लाही दिला आहे. या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर म्हणाले की, बाळासाहेबांचे खरे वारसदार राज ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे यांचे ते वडील असले, तरी त्यांच्या अंगाखांद्यावर राज ठाकरे खेळले. बाळासाहेबांचा विचार राज ठाकरे पुढे घेऊन जात आहेत. बाळासाहेब व्यक्ती नाही विचार आहेत. आमच्यासारख्या तमाम शिवसैनिकांना बाळासाहेबांनी कर्मातून जन्म दिला, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Bala Nandgaonkar : बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार राज ठाकरेच
Sudhir Mungantiwar : ...तर भुजबळ-राऊत-राज ठाकरे-अनिल परब हे भाजपमध्ये दिसले असते

दरम्यान, उध्दव ठाकरेंनी मुलाखतीदरम्यान शिंदे गटावर शरसंधान साधले. मलाई खाण्यासाठी मी मुख्यमंत्रिपदी नव्हतो. स्वतःकडे कोणतीही मोठी खाती ठेवली नव्हती. एका मंत्र्याने दिवा लावला म्हणून ते खातं माझ्याकडे आलं होतं. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार संजय राठोड यांना टोला लगावला. परिवारातले समजून विश्वास ठेवला हीच माझी चूक झाली. त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर यांनी काय वेगळं केलं असतं? त्यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय. स्वतःची तुलना शिवसेनाप्रमुखांशी करत आहेत, असा आरोप नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर केला. सध्या सुरु आहे ती राक्षसी महत्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात, अशी टीका उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com