राजकारण
Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय बोलणार?
मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य आहे. राज्य सरकारकडून गणेशोत्सवाआधी एकेरी मार्ग सुरु करणार असल्याचं सांगितले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम रखडलेलं आहे. यावर राजकीय वर्तुळातून देखिल अनेक प्रतिक्रिया आल्या.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबई-गोवा महामार्गाबाबत या निर्धार मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके सभागृहात मनसेचा निर्धार मेळावा होणार आहे.
या मुंबई-गोवा महामार्गावरुन मनसे आक्रमक झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे आता काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.