मणिपूरमधील दृश्य सरकारांना लाज वाटायला लावणारं; राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

मणिपूरमधील दृश्य सरकारांना लाज वाटायला लावणारं; राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला असल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई: मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 4 मे रोजी घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ही दृश्य हादरवणारी आहेत आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.

मणिपूरमधील दृश्य सरकारांना लाज वाटायला लावणारं; राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
सोमय्यांना का सहन करते? भाजप तोंड का उघडत नाही; दानवेंचा सवाल

राज ठाकरे म्हणाले की, कालपासून मणिपूरमधील समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती 'जैसे थे' आहे. आणि हेच दुर्दैव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

ह्या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण, त्याचवेळेस जर केंद्र सरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं, अशी मागणीही त्यांनी केली.

मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाज मनावर ओरखडा उमटला आहे. आणि ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल. पंतप्रधानांनी आत्ता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मणिपूरमधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशाची बदनामी झाली आहे. या प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही आणि कायद्याचे एकामागून एक पाऊल टाकले जाईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com