Raj Thackeray : शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं

Raj Thackeray : शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होते.

याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत राज ठाकरे म्हणाले की, मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली.

शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. १९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. असे राज ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com