...म्हणून आमच्या पक्षाने ठरवले की, मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा

...म्हणून आमच्या पक्षाने ठरवले की, मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा

मनसे पक्षप्रमुख नेते राज ठाकरे यांनी एमआयजी क्लबमध्ये शनिवारी बैठक घेतली. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा सभेत महायुतीला पाठिंबा दिला.
Published by :
Dhanshree Shintre

मनसे पक्षप्रमुख नेते राज ठाकरे यांनी एमआयजी क्लबमध्ये शनिवारी बैठक घेतली. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा सभेत महायुतीला पाठिंबा दिला. या बैठकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आमच्या पक्षाने ठरवले की, मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा.

महाराष्ट्रासाठीच्या आमच्या काही मागण्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत जातीलच. माझी अपेक्षा आहे की, नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य ही त्यांच्या समान अपत्यांसारखी पाळणं आवश्यक आहे. गुजरात त्यांना प्रिय असणं स्वाभाविक आहे कारण ते गुजरात मधलं आहेत. परंतु इतरही राज्यांमध्ये त्यांनी त्याचप्रकारचे लक्ष या पुढच्या 5 वर्षांमध्ये दिलं जाईल. ही माझी अपेक्षा आहे. पुढे कशाप्रकारे त्यांची पाऊलं पडतायत मला वाटते हे ही पाहणं तितकचं आवश्यक आणि गरजेचं आहे. परंतु आज मी त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे असे राज ठाकरे यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षातल्या लोकांनी, तीन पक्षातल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आहे, कोणाशी बोलायचे आहे आणि पुढे कशाप्रकारे जायचे आहे याप्रकारची यादी एक- दोन दिवसांमध्ये आमच्याकडून तयारी होईल. त्याप्रमाणे ती त्यांच्यापर्यंत जाईल. आमचेही जे पदाधिकारी असतील, महाराष्ट्र सैनिक असतील त्यांनाही ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे. पूर्णपणे सहकार्य करायचे आणि पूर्णपणे प्रचार करण्यासाठी म्हणून मी सगळ्यांना सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com