मला अटक करा, पण माझ्या मुलावर आणि पत्नीवर...; एसीबीच्या धाडीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया

मला अटक करा, पण माझ्या मुलावर आणि पत्नीवर...; एसीबीच्या धाडीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया

आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीची धाड पडली आहे. राजन साळवी यांच्या घरी गेल्या पाच तासापासून एसीबीची टीम तपास करत आहे.

रत्नागिरी : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीची धाड पडली आहे. राजन साळवी यांच्या घरी गेल्या पाच तासापासून एसीबीची टीम तपास करत आहे. या पार्श्वभूमीवर साळवींना उद्धव ठाकरे यांनी फोन करून दिलासा दिला आहे. याबाबत त्यांनी माध्यमांना माहिती दिली.

मला अटक करा, पण माझ्या मुलावर आणि पत्नीवर...; एसीबीच्या धाडीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ; दावोसमध्ये 3 लाख 53 हजार कोटींचे करार

राजन साळवी म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला फोन केला असून विचारपूस केली आहे. संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी असल्याचे उध्दव ठाकरेंनी यावेळी फोनवर म्हंटल्याचे त्यांनी सांगितले. मला पण अटक होऊ शकते. मी अटकेला घाबरत नाही. पण, माझ्या मुलावर आणि पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे हे दुर्दैवी, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

राजन साळवी यांच्या घराच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी घोषणा देत आहेत. राजन साळवी आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा शिवसैनिकांनी देत आहेत.

दरम्यान, राजन साळवी यांच्याकडे ११८ टक्क्यांनी जास्त बेकायदेशीर मालमत्ता सापडल्याने ही चौकशी सुरू असल्याचं समोर आलं आहे. साळवी यांच्या चार मालमत्तांच्या ठिकाणी शोधकार्य सुरू आहे. राजन साळवी यांचं घर, त्यांचं जुनं घर, त्यांच्या भावाचं घर आणि त्यांच्या हॉटेलमध्ये धाडसत्र सुरू असल्याची माहिती राजन साळवींनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com