Raju Shetti : कांद्यावरची निर्यातबंदी हा सरकारचा मूर्खपणा

Raju Shetti : कांद्यावरची निर्यातबंदी हा सरकारचा मूर्खपणा

कोल्हापूर जिल्हाप्रमाणे सांगली जिल्ह्यात उसाला दर मिळावा यासाठी कालपासून सांगलीच्या वसंतदादा साखर करखान्या समोर राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरू आहे.

संजय देसाई, सांगली

कोल्हापूर जिल्हाप्रमाणे सांगली जिल्ह्यात उसाला दर मिळावा यासाठी कालपासून सांगलीच्या वसंतदादा साखर करखान्या समोर राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरू आहे. गेले 23 तासांपासून आंदोलन सुरूच आहे. पण सरकार लक्ष घालायला तयार नाही. 23 तास उलटून गेले आंदोलन सुरू आहे. वाहतूक ठप्प आहे. मला आश्चर्य वाटते सरकार आणि प्रशासन काहीच करत नाहीत. जिल्हाधिकारी पत्र देत नाहीत. ते साखर कारखान्याच्या टोळीत सामील झाले आहेत का. कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. ते देण्यास तयार आहेत पण झारीतला शुक्राचार्य कोण आहे ये कळालया हवे.

कांद्यावरची निर्यातबंदी हा सरकारचा मूर्खपणा आहे. जेव्हा कांद्याला दर नव्हता त्यावेळी कांदा रस्त्यावर फेकला. त्यावेळेस सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडलं. एकीकडे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक राहिलेला नाही.

जो काही थोडाफार कांदा शिल्लक राहिलेला आहे. तो विकून खराब झालेल्या कांद्याचे झालेल्या नुकसान भरून काढायचे असताना शेतकऱ्याला सरकारने वाटाण्याची अक्षता लावल्यात. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचं. त्याला चार पैसे मिळत असतील तर सरकार आडवं का येतं. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उरलाय आणि सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय शेतकरी मागे हटणार नाही. असे राजू शेट्टी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com