....म्हणून घेतली उध्दव ठाकरेंची भेट; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितले

....म्हणून घेतली उध्दव ठाकरेंची भेट; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे चर्चांना उधाण आले होते. यानंतर अखेर राजू शेट्टी यांनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यामुळे राजू शेट्टी महाविकास आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर अखेर राजू शेट्टी यांनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले आहे. उद्धव ठाकरेंना राजकीय हेतूने भेटलो नाही. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी म्हणून भेटलो होतो, असे राजू शेट्टींनी म्हंटले आहे.

....म्हणून घेतली उध्दव ठाकरेंची भेट; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितले
पाणबुडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग येथेच होणार; रविंद्र चव्हाणांची स्पष्टोक्ती

राजू शेट्टी म्हणाले की, एक तर केंद्र सरकारने अदानींवरील प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्यतेलावर पाच टक्के आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबीनला भाव नाही. 2000 साली असलेला भाव चार हजार होता. 24 वर्षानंतर तो आताही तेवढाच आहे याचं कारण मोठ्या प्रमाणात कच्चं तेल जे बाहेरच्या देशातून आयात झाला आहे त्याच्यावरील आयात शुल्क 2025 पर्यंत पाच टक्के कमी केल्यामुळे परिणाम झाला आहे.

सोयाबीनच्या प्रश्नावर, कर्जमाफीच्या मुद्द्यावर मराठवाड्यामध्ये दौरा सुरू करणार आहे आणि त्यासाठी अदानींविरोधात उद्धव ठाकरे यांची जी लढाई आहे ती शेतकऱ्यांची सुद्धा लढाई आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळावा म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्यासोबत राहू असल्याचे आश्वासन उध्दव ठाकरेंनी आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

जागा वाटपासंदर्बात काही चर्चा झाली का, असा प्रश्न विचारला असता राजू शेट्टी म्हणाले, या संदर्भात आमची काही चर्चा झाली नाही. कारण महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आमचा विचार नाही. नुकतेच अदानी समूहाने शरद पवार यांच्या कोणत्यातरी संस्थेला 25 कोटीची देणगी दिली आहे त्यामुळे त्यांच्याकडे जाण्यास अर्थ नाही असं मला वाटतं.

आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील तेव्हा आम्ही आमच्या भूमिकेसोबत जाऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राजू शेट्टी यांनी लोकसभेसाठी आपली भूमिका जाहीर करताना म्हटले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा लढवणार आहे. त्यात हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा, परभणी आणि माढा या मतदारसंघात निवडणूक लढवण्याचे अंतिम असल्याचे राजू शेट्टी म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com