Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार आहे.

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सहा उमेदवारांनी अर्ज भरल्याने निवडणूक बिनविरोध होणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सातजणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीसाठी दाखल झालेला अपक्ष उमेदवाराचा सातवा अर्ज छाननीत बाद झाला आहे. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांनी अर्ज केले आहेत. शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांनी तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांनी अर्ज दाखल केले.

त्यानंतर आता अपक्ष म्हणून विश्वास जगताप यांनी अर्ज भरला होता. यासाठी सूचक, अनुमोदक म्हणून आमदारांच्या सह्या लागतात मात्र जगताप यांच्याकडून त्याची पुर्तता करण्यात आली नाही, यामुळे त्यांचा अर्ज छाननीत बाद करण्यात आला. उमेदवारीला अर्ज मागे घेण्याची फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. त्यावेळी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com