मी देत आहे राष्ट्रवादीला शाप...; रामदास आठवलेंची खास कविता

मी देत आहे राष्ट्रवादीला शाप...; रामदास आठवलेंची खास कविता

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत प्रचार केला.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे वातावरण आता तापले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचारासाठी सुरु आहे. कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात आज भाजपची सभा झाली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत प्रचार केला.

 मी देत आहे राष्ट्रवादीला शाप...; रामदास आठवलेंची खास कविता
टिळकांचे घराणे वापरून सोडून दिलं; उध्दव ठाकरेंची टीका,...तर शिवसैनिक म्हणवून घेऊ नका

रामदास आठवले म्हणाले की, मी देत आहे राष्ट्रवादीला शाप, कारण निवडून येणार आहेत अश्विनी जगताप. नरेंद्र मोदी आहेत विरोधकांचे बाप, का निवडून येणार नाहीत अश्विनी लक्ष्मण जगताप. देवेंद्र फडणवीस आणि मी हातात घेऊन आलोय जय भीमची काठी कारण आम्ही आहोत अश्विनी ताईंच्या पाठी, अशा कवितेच्या माध्यमातून त्यांनी प्रचार केला.

देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केला. पण, राष्ट्रवादी निवडणूक लढवत आहे. २०२४ ला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार हे निश्चित आहे. मग, मीही मंत्री झालोच. शरद पवार यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. त्यांनी अजित पवार यांना सांगायला हवं होतं की उमेदवार देऊ नका, असे आठवले यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com