मराठा आरक्षणाप्रश्नी दोन दिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे; आठवलेंची मागणी, जरांगेंना केली 'ही' विनंती

मराठा आरक्षणाप्रश्नी दोन दिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे; आठवलेंची मागणी, जरांगेंना केली 'ही' विनंती

राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. लोकप्रतिनिधींकडूनही जरांगेंना पाठिंबा देण्यात येत आहे. अशात, रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.

मुंबई : राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आठवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत आहे. तर, लोकप्रतिनिधींकडूनही जरांगेंना पाठिंबा देण्यात येत आहे. अशात, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. कोणाचेही आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण द्यावे. यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी आठवलेंनी केली आहे. तसेच, सरकारला वेळ देण्याचे आवाहनही त्यांनी जरांगेंकडे केले आहे.

मराठा आरक्षणाप्रश्नी दोन दिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे; आठवलेंची मागणी, जरांगेंना केली 'ही' विनंती
मराठा समाज आक्रमक; काळी दिवाळी साजरी करणार

मराठा आरक्षणाचा विषय तीव्र स्वरूप धारण करत आहे. मनोज जरांगे पाटील हे मागील महिनाभर आंदोलन करत आहेत. कोणाचेही आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. तळागाळातील मराठा समाजाला शिक्षण देखील पूर्ण करता येत नाही. ही मागणी संपूर्ण मराठा समाजाला मिळावी अशी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात सर्व ओबीसींना देखील आरक्षण मिळत नाही. ज्यांचे उत्पन्न आठ लाखांहून कमी आहे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना आरक्षण द्यावे. ही मागणी जरांगे पाटील यांचीसुद्धा आहे.

जरांगे पाटील यांनी शांततेने आंदोलन सुरु केले होते. पण, मागील काही दिवसात राज्यात जाळपोळ झाली. आज सर्वपक्षीय बैठक झाली यातदेखील आम्ही भूमिका मांडली. जरांगे पाटील यांचा जीव वाचला पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतो कि दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे. तमिळनाडूमध्ये असे अधिवेशन घेतले होते, कर्नाटकमध्येही घेतले होते. असेच महाराष्ट्रात घ्यायला पाहिजे, अशी मागणी आठवलेंनी केली आहे.

कोणालाही अडचणीत न आणता मराठा आरक्षण दिले पाहिजे. जरांगे पाटील यांचा आग्रह आहे की ते ताबडतोब झाले पाहिजे. मात्र, त्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाला असं वाटत कि मराठा समाज श्रीमंत आहे. मराठा समाज मागासलेला आहे हे न्यायालयाला पटवून दिले पाहिजे. म्हणून जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे. त्यांनी थोडा वेळ द्यायला पाहिजे. जरांगे पाटील यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यांनी आपली उपोषण सोडावे ही आमची इच्छा आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी आम्ही नक्की पंतप्रधान मोदी यांना भेटू. पण पंतप्रधान यांच्यासमोर फक्त मराठा समाजाचा विषय नाहीये. याचा विचार जरांगे पाटील आणि मराठा समाजाने करावा. थोडा वेळ लागेल पण आरक्षणा नक्की मिळेल. नक्की यातून मार्ग मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे, असेही रामदास आठवलेंनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com