Bhaskar Jadhav
Bhaskar JadhavTeam Lokshahi

शिवसेना, शिंदे गटाचे नेते भिडले! एक म्हणाले, माझ्या पाया पडले, दुसरे म्हणाले, हा खोटा माणूस

आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गट नेते रामदास कदम यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध

राज्यात राजकीय घडामोडी वेग घेत असताना शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वाद दररोज नव्या रूपात समोर तेर आहे. त्यातच आता शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गट नेते रामदास कदम यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. रामदास कदम त्यावेळी माझ्या पाया पडले होते अशी टीका भास्कर जाधव यांनी केल्यानंतर आता रामदास कदम यांनीही जाधवांवर विखारी टीका केली आहे.

Bhaskar Jadhav
महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करतात याचं आश्चर्य- देवेंद्र फडणवीस

रामदास कदम त्यावेळी माझ्या पाया पडले होते- भास्कर जाधव

रामदास कदम तुम्ही सांगता की राष्ट्रवादीबरोबर गेलेले आम्हाला पसंत पडलेले नाही. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली. पण, रामदास कदम शपथ घेऊन सांगा की विधानसभेचे अधिवशेन चालू असताना मी त्यावेळी रत्नागिरीचा पालकमंत्री होतो. तुम्ही येऊन माझे पाय धरले. मला सांगितलं की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येतोय, तू मला विरोध करू नको. ह्या असल्या कदम यांच्या निष्ठा आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला शिव्या देऊन उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचे काम करू नका, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला होता.

Bhaskar Jadhav
वेदांतामध्ये डील झालं, चौकशी होणार? उद्योगमंत्र्याचे सूचक वक्तव्य

भास्कर जाधव खोटा आहे- रामदास कदम

भास्कर जाधव यांच्या टीकेवर रामदास कदम यांचे जोरदार प्रत्युत्तर म्हणाले की, नौटंकी करण्याचे काम फक्त भास्कर जाधवच करु शकतात. 1995 ला मी शिवसेना प्रमुखांना विनंती करुन त्यांना तिकीट द्यायला लावलं होतं. तेव्हा रस्त्यावर आडवे पडून माझ्या पायावर डोके ठेवले होते, हे सर्व ते विसरले. त्यावेळी उद्धवजीनी 9 तास बसवून ठेवले होते आणि भेटलेच नाहीत. शिवसेना सोडली तेव्हा चिपळूणच्या बहादूरशेख नाक्यावर ढसाढसा रडत होते. हा माणूस खोटा आहे. असा घणाघात कदमांनी जाधवांवर केला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com