प्रहार जनशक्ती पार्टीच्या शहराध्यक्षावर खंडणीचा गुन्हा

प्रहार जनशक्ती पार्टीच्या शहराध्यक्षावर खंडणीचा गुन्हा

Published by :

मयुरेश जाधव | बदलापूर पालिकेच्या एका ठेकेदाराकडून खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल झालाय. यामध्ये प्रहार जनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष अविनाश सोनवणे यांच्यासह अन्य तिघांचा समावेश आहे. अविनाश सोनवणे यांनी मात्र ठेकेदाराचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यानं आपल्याला गोवण्यात येत असल्याचा आरोप केलाय.

विश्वास जामघरे असं या ठेकेदाराचं नाव असून त्यांनी कोरोनाकाळात बदलापूर पालिकेला सुरक्षारक्षक आणि ट्रॅफिक वॉर्डन पुरवण्याचा ठेका घेतला होता. मात्र या कामात त्रुटी असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पार्टीचे बदलापूर शहराध्यक्ष अविनाश सोनावणे यांनी माहितीच्या अधिकारात पालिकेकडून या कामाची माहिती घेतली होती. मात्र यानंतर अविनाश सोनावणे हे आपल्याला ब्लॅकमेल करत असून २५ लाखांची खंडणी मागत असल्याचा आरोप विश्वास जामघरे यांनी केलाय. तसंच २५ लाखांवरून तडजोड करत शेवटी १० लाखांची मागणी सोनावणे यांनी केली. आणि खंडणी मागत आपल्याला मानसिक त्रास दिला, असाही आरोप जामघरे यांनी केलाय. याप्रकरणी जामघरे यांनी ठाणे गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने अविनाश सोनावणे यांच्यासह अमोल सोनवणे, विशाल गायकवाड आणि संजय कदम यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईची मागणी ठेकेदार विश्वास जामघरे यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com