Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

हा कट फक्त माझ्याबाबतीत नाही तर... श्रीकांत शिंदेंवर केलेल्या आरोपांनतर राऊतांचे मोठे विधान

राज्यात काय चालल आहे हे जनतेला आणि राज्यकर्त्यांना समजण्यासाठी मी तक्रार दिली आहे.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे नुकताच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. त्यातच आता ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र लिहले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्वाची माहिती दिली आहे.

Sanjay Raut
मोठी बातमी! श्रीकांत शिंदे यांनी माझी गुंडाला सुपारी दिली? राऊतांचा गंभीर आरोप

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सत्तेतील नेते, आमदार, खासदार धमकीची भाषा वापरतात. हा कट फक्त माझ्याबाबतीत नाही तर येणाऱ्या काळात अजूनही काही गोष्टी उघड होतील. सरकार बदलल्यानंतर विरोक्षी पक्षातील लोकप्रतिनिधींची सुरक्षा काढून घेण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धमकी देण्यात आली, काँग्रेचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, आता मला मारण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे. याबाबत माझी व्यक्तीगत तक्रार नाही. परंतु, राज्यात काय चालल आहे हे जनतेला आणि राज्यकर्त्यांना समजण्यासाठी मी तक्रार दिली आहे. तुरूंगात असणाऱ्या गुंडांना जामिनावर सोडून त्यांना असे टास्क दिले जात आहेत. असे गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती मला मिळाली आहे. माझी सुत्रे ही अतिशय विश्वसनीय असतात. त्यामुळे माझ्यावर लवकरच हल्ला होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई आणि ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहून माझ्यावर हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com