Uddhav Thackeray | Ravi Rana
Uddhav Thackeray | Ravi RanaTeam Lokshahi

सी व्होटर कंपनी महाविकास आघाडीने तयार केली : रवी राणा

सी व्होटरच्या सर्व्हेवरुन महाविकास आघाडीवर रवी राणांचे टीकास्त्र

अमरावती : सी व्होटरच्या सर्व्हेनुसार जर आज महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला एकूण 34 जागा मिळू शकतात. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, यावर भाजप नेते रवी राणा यांनी टीकास्त्र सोडले आहे. सी-व्होटर कंपनी ही महाविकासआघाडीने तयार केलेली कंपनी आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे.

Uddhav Thackeray | Ravi Rana
राहुल गांधींची ‘भारत जोडो’, जम्मू-कश्मीरच्या भूमीवर नवा अध्याय; राऊतांनी केले कौतुक

सी-व्होटरने इंडिया टुडेसाठी सर्वेक्षण केले. यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळतील असा दावा यात करण्यात आला आहे. यावर अमरावती जिल्ह्यातील आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली. सी व्होटर कंपनी ही महाविकास आघाडीने तयार केलेली कंपनी आहे. जनतेची दिशाभूल करणारा हा सर्वे आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा शिंदे गट व भाजपला मिळतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला.

तर बाळासाहेबांच्या विचाराची सेना ही भाजप सोबत आहे. तसेच उद्धव ठाकरे सरकारमध्ये अडीच वर्ष महाराष्ट्राचा विकास थांबला होता. आता महाराष्ट्र धावत आहे. त्याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. येणारा काळ हा भाजपा-शिंदे गटाचा आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com