राजकारण
शिंदे गटाच्या 40 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; कारण काय?
शिंदे गटाच्या 40 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिल्याची माहिती मिळत आहेत.
शिंदे गटाच्या 40 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिल्याची माहिती मिळत आहेत. कांदिवली, मालाड, चारकोप विभागातील शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामे दिले आहेत.
तिन्ही विधानसभातील पदाधिकारी यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती आहे. रामदास कदम यांचा मुलगा सिद्धेश कदम यांना कंटाळून राजीनामा दिल्याचे कारण समोर आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
सिध्देश कदम यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.