राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजेंद्र वैद्य यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

अनिल ठाकरे | चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजेंद्र वैद्य यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत वैद्य यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ते दुखावले. याच नाराजीतून त्यांनी जिल्हाध्यक्षपद सोडल्याची चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असतानाच वैद्य यांचे राजीनामा नाट्य घडल्यामुळे पक्षाश्रेष्ठी अस्वस्थ झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

मूळचे काँग्रेसचे वैद्य यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांना लवकरच जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. सन २०१४ पर्यंत ते या पदावर कायम होते. त्यानंतर संदीप गड्डमवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची (ग्रामीण) धुरा आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गड्डमवार शिवसेनेत गेले. त्यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून वैद्य यांच्यावरच पक्षनेतृत्वाने विश्वास दाखविला. तेव्हापासून आजतागायत वैद्य या पदावर कायम आहेत. या काळात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी वैद्य यांची चांगलीच जवळीक निर्माण झाली.

परंतु, जिल्ह्यातील पक्षातंर्गत गटातटाचे राजकारण ते थांबवू शकले नाही. राष्ट्रवादी युवक, शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी कायम दुरावा राहिला. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मागील सहा महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येवून गेले. त्यावेळीही राष्ट्रवादीत दुफळी कायम राहिली. याचे पडसाद पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांमध्येही उमटायला लागले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा
राज ठाकरे आणि मी दहा वर्षातील बॅकलॉग भरून काढतोय - एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांना पक्षाने बढती दिली. ते प्रदेश कार्याध्यक्ष झाले. या रिक्त जागेवर आपल्या मर्जीतील माणूस असावा म्हणून वैद्य यांनी प्रयत्न केले. त्यांनी या पदासाठी राकेश सोमाणे यांना पसंती दिली. पक्षाने फैय्याज शेख यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद दिले. त्यामुळे वैद्य कमालीचे नाराज झाले.

विशेष म्हणजे फैय्याज शेख यांना काही दिवसांपूर्वीच चंद्रपुरातील एका बारमध्ये मारहाण झाली होती. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच फिरला. त्यानंतरही पक्षाने फय्याज शेख यालाच झुकते माप दिले. त्यामुळे वैद्य यांनी आपली नाराजी व्यक्त करीत पक्षनेतृत्वाकडे राजीनामा पाठविला. कोणतीही नाराजी नाही. नऊ वर्ष जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. आता पक्षाने नव्या नेतृत्वाला संधी द्यावी, यासाठी राजीमाना दिला असल्याचे राजेंद्र वैद्य यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com