झारखंडमध्येही रिसॉर्ट पॉलिटीक्स; सोरेन समर्थक आमदारांना छत्तीसगडला नेणार?

झारखंडमध्येही रिसॉर्ट पॉलिटीक्स; सोरेन समर्थक आमदारांना छत्तीसगडला नेणार?

झारखंडमध्येही राजकीय संकट निर्माण झाले

रांची : झारखंडमध्येही राजकीय संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीत महाआघाडीच्या म्हणजेच राजद आणि काँग्रेसच्या आमदारांनाही बोलावण्यात आले आहे. या सभेला आलेल्या आमदारांच्या गाडीत कपड्यांनी भरलेल्या पिशव्या दिसल्याने झारखंडमध्येही रिसॉर्ट पॉलिटीक्स सुरु झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेमंत सोरेन यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर तीन वेळा आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. आजही रांचीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून बैठक घेण्यात आली आहे. यानंतर हेमंत सोरेन आमदारांना तीन बसमधून रिसॉर्टमध्ये नेण्यात आले आहे. यासोबतच सर्व आमदारांचे फोनही बंद करण्यात आले आहेत. महाआघाडीच्या आमदारांना छत्तीसगडला पाठवल्याची शक्यता आहे.

तत्पुर्वी, खाण लीज प्रकरणात निवडणूक आयोगाने चौकशीनंतर आपला अहवाल झारखंडच्या राज्यपालांना पाठवला आहे. त्यात मुख्यमंत्री हेमंत यांना आमदार पदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजेच त्यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस केली आहे. यामुळे सोरेन आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. तर, सोरेन यांना पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सोरेन यांच्या निकटवर्तियाच्या ठिकाण्यांवर ईडीने काही दिवसांपूर्वीच छापे मारले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही आपला इरादा व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून मी एका आदिवासीचा मुलगा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यामुळे आमचा मार्ग कधीच थांबला नाहीआणि आम्हाला या लोकांची भीतीही वाटत नाही. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com