साताऱ्यातील ग्रामपंचायतीचा अभूतपूर्व निकाल; दिग्गजांचे पॅनल पडले अन् अपक्ष निवडून आले

साताऱ्यातील ग्रामपंचायतीचा अभूतपूर्व निकाल; दिग्गजांचे पॅनल पडले अन् अपक्ष निवडून आले

साताऱ्यात जावली तालुक्यातील भणंग या एकमेव लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल समोर आला आहे.

प्रशांत जगताप | सातारा : साताऱ्यात जावली तालुक्यातील भणंग या एकमेव लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल समोर आला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी पॅनलचे दोन्ही प्रतिस्पर्धी सर्व उमेदवार पडले असून सर्व अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी आज होत असून अटीतटीची स्पर्धा सुरु आहे. परंतु, जावली तालुक्यातील भणंग या एकमेव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल समोर आला. गावातील भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे दीपक पवार यांच्या पॅनलचे एकूण 14 उमेदवार दोन्हीही पॅनलमधून निवडणूक लढवत होते. परंतु, दोन्ही पॅनलचे परस्पर विरोधी सर्व उमेदवार या निवडणुकीत पडले असून अपक्ष उमेदवारांची लॉटरी लागली असल्याने हा निकाल लक्षवेधी ठरला आहे. या निकालामुळे भणंग गावात प्रथमच अभूतपूर्व इतिहास घडला आहे.

यामध्ये थेट सरपंच निवडणुकीत राष्ट्रवादीचे दीपक पवार यांच्या गटाचे गणेश साईबाबा जगताप हे उमेदवार निवडून आले. तर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाच्या पॅनल मधील एक उमेदवार निवडून आला आहे.

दरम्यान, राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले. मतदान होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही महत्त्वाची आहे. कारण या सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे. या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com