Rohit Pawar : पत्रकारांवर गुन्हे ही हुकूमशाही वृत्ती आजच्या सत्ताधाऱ्यांनी अंगिकारली आहे
किरीट सोमैया व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. किरीट यांच्या तक्रारीनंतर संपादक कमलेश सुतार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळतेय. यावर सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, लोकशाही न्यूजचे @kamleshsutar यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळाले, मात्र प्रशासनाने सुतार यांच्यावर गुन्हा नोंदवताना दाखवलेली हीच तत्परता बारसूमध्ये शशिकांत वारीसे यांच्या हत्येनंतर व जळगावमध्ये पत्रकाराला झालेल्या मारहाणवेळी दाखवली नाही, हे दुर्दैव आहे. सर्वसामान्य जनतेवर अमानुष लाठीचार्ज आणि लोकांची बाजू मांडणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे ही हुकूमशाही वृत्ती आजच्या सत्ताधाऱ्यांनी अंगिकारली आहे. हे स्पष्टपणे दिसत आहे. पत्रकारांच्या बाबतीत अशी घटना घडल्यास सर्व पत्रकारांनी मतभेद विसरून अन्यायाच्या विरोधात एकत्रित विरोध नोंदवला पाहिजे, असे मला वाटते. असे रोहित पवार म्हणाले.