आम्ही भांडत बसलो अन् भाजपा मजा बघतंय - रोहित पवार
अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, सध्या पक्षात पडलेल्या फुटीमुळे मी अनेकांवर टीका करत आहे मात्र या टीका करत असताना काही बोलायचं राहून जातं आणि अनेक गोष्टींवर बोलायला माझं वय कमी पडतं म्हणून मी बोलू शकत नाही. मी आजोबांबरोबर राहण्याची, पक्षाबरोबर राहण्याची आणि जनता कार्यकर्त्यांबरोबर राहण्याची भूमिका घेतली आहे.
अनेक नेते आपल्यातल्या आपल्यात गुंतून राहावं यासाठी आता त्यांनी राष्ट्रवादीतदेखील फुट पाडली. पवार कुटुंबात भाजपने भांडणं लावली आहे. मागील काही दिवस राष्ट्रवादीतील फुटीमुळे आम्ही भांडत बसलो आहोत आणि भाजप या सगळ्याची मजा बघत बसलं आहे. असे रोहित पवार म्हणाले.