Rohit Pawar On Nawab Malik : उशिरा का होईना साहेब आपल्याला न्याय मिळाला
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना वैद्यकीय आधारावर सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन देण्यात आला. नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. किडनीच्या ट्रान्सप्लांटसाठी मलिकांनी आधी हायकोर्टाकडे जामीनाची मागणी केली होती. त्यावेळी ईडीनं जोरदार विरोध केला होता. मात्र आज सुप्रीम कोर्टात ईडीने कोणताही विरोध केला नाही.
राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, उशिरा का होईना साहेब आपल्याला न्याय मिळाला, तब्येतीची काळजी घ्या, आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र लढूया!
ईडीच्या कोठडीत का होते मलिक?
नवाब मलिक यांनी सरदार शहावली खानच्या साथीनं गोवावाला कंपाऊंडच्या भाडेकरुंचा सर्व्हे केला. मलिक यांनी सरदार खान आणि हसीना पारकरसोबत अनेकदा बैठका केल्या. मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडमध्ये बेकायदेशीर एक गाळा अडवून ठेवला. 1993 च्या बॉम्बस्फोटातला आरोपी सरदार शहावली खान जेलमधून पॅरोलवर बाहेर यायचा तेव्हा मलिक आणि हसीना पारकर यांच्यात बैठका व्हायच्या. गोवावाला कंपाऊंडचा अधिकाधिक भाग गिळंकृत करण्यासाठी मलिकांनी बेकायदेशीर भाडेकरु घुसवले. हसीना पारकरने सलीम पटेलच्या साथीनं गोवावाला कंपाऊंडचा वाद मिटवल्याची हसीनाच्या मुलाने कबुली दिली. काही काळाने ही मालमत्ता नवाब मलिकांना विकण्यात आली. हसीना पारकरचा मुलगा अलिशान याने याबाबत कबुली दिल्याचा ईडीच्या आरोपपत्रात उल्लेख आहे.