Rohit Pawar : शासन आपल्या दारीचे नाटक सरकारने बंद करावे

Rohit Pawar : शासन आपल्या दारीचे नाटक सरकारने बंद करावे

शेतकऱ्यांसमोर अडचणी असताना कृषी मंत्री कुठे आहेत? हे कोणालाच माहीत नाही.
Published by  :
Siddhi Naringrekar

विकास माने, बीड

शेतकऱ्यांसमोर अडचणी असताना कृषी मंत्री कुठे आहेत? हे कोणालाच माहीत नाही. असं म्हणत रोहित पवार यांनी थेट कृषिमंत्र्यावर टीकास्त्र डागले. युवा संवाद यात्रेदरम्यान रोहित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. पुढे बोलताना रोहित पवार यांनी परळीत होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर सडकून टीका केली. शासन आपल्यादारीचे नाटक सरकारने बंद करावे अशी मागणी पवारांनी केली.

राज्याचा अभ्यास करून दुष्काळाची यादी जाहीर केली नाही. सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असून 40 तालुक्यांची यादित निकष वेगळे आणी नंतर आलेल्या यादीत निकष वेगळे? असा सवाल उपस्थीत केला. शेतकऱ्याची खरी अडचण सरकारने समजून घेतली पाहिजे. तर शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून. शासनाने कितीही गाड्या पाठवल्या कितीही अंश दाखवल्या तरी शासन आपल्या दारी कार्यक्रमाला लोक येतील असं मला वाटत नाही.

सामान्य लोकांच्या दारी हे शासन आलं पाहिजे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सांगितले म्हणून लोकांना शासनाच्या दारी घेऊन जातं आणि पंधरा कोटी रुपये खर्च केला जातो. शासन आपल्या दारीचे नाटक सरकारने बंद करावे शासनाने कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या दारी जाऊन अडचण समजून घेऊन मार्ग काढला पाहिजे असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com