नितेश राणे भाजपचे नाच्या आहेत का? रुपाली ठोंबरेंची जळजळीत टीका

नितेश राणे भाजपचे नाच्या आहेत का? रुपाली ठोंबरेंची जळजळीत टीका

नितेश राणेंच्या टीकेचा रुपाली ठोंबरे-पाटील यांनी घेतला समाचार

पुणे : महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत, अशी जोरदार टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे. या टीकेला आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे भाजपचे नाच्या आहेत का, अशा शब्दात रुपाली ठोंबरे पाटलांनी राणेंवर जळजळीत टीका केली आहे.

नितेश राणे भाजपचे नाच्या आहेत का? रुपाली ठोंबरेंची जळजळीत टीका
'भाकरी खायची मातोश्रीची, अन चाकरी करायची सिल्व्हर ओकची'; कोणी केली राऊतांवर टीका?

भाजपा-शिंदे गटामुळे राजकारणाचा दर्जा खालावला आहे. विरोधकांबाबत बोलताना वारंवार सूड बुद्धीने बोलले जाते. यासोबतच अनेकदा अश्लील शब्द देखील वापरले जातात. गौतमी पाटील ही स्वतःच्या पोटासाठी व्यवसाय करते. तिची तुलना संजय राऊत यांच्याबरोबर करणे म्हणजे महिलांना हिणवण्याचे कृत्य आहे, अशी टीका रुपाली ठोंबरे पाटील यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला आहे.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसने एका महिलेला ठाकरे गटाला भाडेतत्वावर दिलं आहे, अशी टीका तानाजी सावंत यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केली होती. याचाही समाचार रुपाली ठोंबरे-पाटलांनी घेतला आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या मेंदूवर इलाज करावा. तसेच, भाजप आणि शिंदे गटाने वाचाळवीरांना आवरावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com