ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर; पालिकेविरोधात आता उच्च न्यायालयात धाव

ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर; पालिकेविरोधात आता उच्च न्यायालयात धाव

ऋतुजा लटके यांचा राजीनामा आज महापालिकेकडून फेटाळण्यात आला आहे. यामुळे उध्दव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

मुंबई : अंधेरी-पूर्व मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा राजीनामा आज महापालिकेकडून फेटाळण्यात आला आहे. यामुळे उध्दव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. महापालिकेविरोधात ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अंधेरी-पूर्व मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी दिली होती. शासकीय नोकरीचा राजीनामा दिल्याशिवाय कोणतीही निडणूक लढवता येत नाही. यानुसार त्यांनी राजीनामा, एका महिन्याचे वेतन पालिकेच्या कोषागारात जमा केलेले आहे. मात्र अजूनही प्रशासनाने हा राजीनामा मंजूर केलेला नाही.

यातच ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला राजीनामा मंजूर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्याच तातडीने सुनावणी होणार आहे. न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आहे. ऋतुजा लटके यांच्या बाजूने अॅड. विश्वजित सावंत न्यायालयीन लढाई लढणार आहेत, अशीही माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

तर, ऋतुजा लटके यांना शिंदे गट आमिष देत आहेत. मंत्री पद देतो असं आमिष देत आहेत. जाणीवपूर्वक ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही. आमचे सगळे प्लॅन तयार आहेत. वेळ आल्यावर कळेल, असेही अनिल परब यांनी सांगितले आहे.

त्यांनी राजीनामा, एका महिन्याचे वेतन पालिकेच्या कोषागारात जमा केलेले आहे. मात्र अजूनही प्रशासनाने हा राजीनामा मंजूर केलेला नाही.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com