होय माझ्याकडे बंदूक आहे, पण...; सदा सरवणकरांचे गोळीबारीच्या आरोपांना उत्तर

होय माझ्याकडे बंदूक आहे, पण...; सदा सरवणकरांचे गोळीबारीच्या आरोपांना उत्तर

गोळाबार केल्याच्या आरोपांना सदा सरवणकरांनी पत्रकार परिषद घेत दिले उत्तर

मुंबई : शिवसेना-शिंदे गटामध्ये झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. अशात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे बंदूक आहे. पण, ती लायसन्सची आहे. पोलीस सोबत असताना मी माझी बंदूक सोबत कशाला ठेवू, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

सदा सरवणकर म्हणाले की, गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी हे आपल्या दृष्टीने महत्वाचा सण आहेत. प्रतिवर्षी शिवसेनेच्या वतीने तिथे स्वागत केले जाते. पुष्पवृष्टी, पुष्पहार देण्यात येतात. आमचा स्वागत कक्ष होता. मनसेचा देखील कक्ष होता. तसेच, अजून एका गटाचा कक्ष होता. शनिवारी रात्री 12 वाजता संतोष तेलवणे यांच्यावर हल्ला करण्याच्या दृष्टीने काही जण येणार होते. हे कळवल तर मी तिकडे गेलो होतो, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

सणासुदीला डिवचणे सुरु होत ते व्हायला नको होते. स्वागत कक्षाच्या बाहेर जे झालं ते विसरून गेले पाहिजे होते. सोशल मीडियावर घडलं ते तिथेच संपायला हवं होते. घरावर जायला नको होते. माझ्यावर कोणतेही आरोप केले जाता आहेत. माझ काम दिसतंय त्यांच्याकडे काम दाखवण्यासारखं नाहीये, असा निशाणाही सरवणकर यांनी शिवसेनेवर साधला आहे.

मी कोणताही गुन्हा केलेला नाही. महेश आणि आम्ही लहानाचे मोठे एकत्र झालो आहोत. रात्री मी गेलो. तेव्हा पोलीस अधिकारी होते. माझे पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका आहे मला बोलवलं तर मी जाईन. माझ्या हातून गोळीबार झालेला नाही. मला कामाने कोणी संपवू शकत नाही. म्हणूनच अशा प्रकारे मला बदनाम केले जात आहे. आपण एकमेकांना कामाने जिंकू. कामाने मोठे होऊ व लोकांची मन जिंकू, असे आवाहन त्यांनी केले आहे. मी माझ्या मनाने अर्ज दिलेला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले म्हणून मी अर्ज दिलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

तसेच, गणपती विसर्जना दिनी शिंदे गटाने म्याव म्याव म्हणत शिवसेनेला डीवचले होते. यावर बोलताना सदा सरवणकर म्हणाले, जे डिवचलं जातंय ते होऊ नये ही आपली संस्कृती नाही. असे कोणी बोलले असतील तर मी सर्वांना सांगेन असं करू नका. समाधानने असं बोललं असेल, असं मला वाटतं नाही. माझ्याकडे बंदूक आहे. पण, ती लायसन्सची आहे. पोलीस सोबत असताना मी माझी बंदूक सोबत कशाला ठेवू, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com